hanuman chalisa in marathi I हनुमान चालीसा अर्थासगत मराठीतुन

नमस्कार मित्रांनो,

हनुमान चालीसा गोसावी तुलसीदास यांनी रचलेली एक फार छान रचना आहे, हनुमान चालीसा ही मारुती हनुमान यांना समर्पित केलेले आहे.

हनुमान चालीसा ही खरच एक भक्तीचा झरा आहे, या चालीसा मध्ये 40 श्लोक आहेत. 

जे हनुमानाची असीम शक्ती त्यांचे भगवान रामा वरील आढळ प्रेम व श्री हनुमानाचे त्यांच्या भक्तावर असलेले प्रेम कृपा यांचे वर्णन केलेले आहे. 


हनुमान चालीसा ही खऱ्या अर्थाने भक्ती आणि ज्ञानाचा अमूल्य खजिना आहे, तुलसीदास महाराजांनी रचलेली ही रचना फक्त 40 चरणांमध्ये आपल्याला हनुमानाचे सर्वांगदर्शन घडवते. 



hanuman chalisa in marathi I हनुमान चालीसा मराठी भाषेमध्ये

तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हनुमान चालीसा संपूर्णपणे कशी आहे ते बघू म्हणजे तुम्हाला जर प्रिंट आउट पाहिजे असेल तर तुम्ही ते काढू शकाल किंवा लिहून घेऊ शकाल.

दोहा

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार
बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार

चौपाई

जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥

राम दूत अतुलित बल धामा
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥२॥

महाबीर बिक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी॥३॥

कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुँचित केसा॥४॥

हाथ बज्र अरु ध्वजा बिराजे
काँधे मूँज जनेऊ साजे॥५॥

शंकर सुवन केसरी नंदन
तेज प्रताप महा जगवंदन॥६॥

विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर॥७॥

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मनबसिया॥८॥

सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा
विकट रूप धरि लंक जरावा॥९॥

भीम रूप धरि असुर सँहारे
रामचंद्र के काज सवाँरे॥१०॥

लाय सजीवन लखन जियाए
श्री रघुबीर हरषि उर लाए॥११॥

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरत-हि सम भाई॥१२॥

सहस बदन तुम्हरो जस गावै
अस कहि श्रीपति कंठ लगावै॥१३॥

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा॥१४॥

जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कवि कोविद कहि सके कहाँ ते॥१५॥

तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा॥१६॥

तुम्हरो मंत्र बिभीषण माना
लंकेश्वर भये सब जग जाना॥१७॥

जुग सहस्त्र जोजन पर भानू
लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥१८॥

प्रभु मुद्रिका मेलि मुख माही
जलधि लाँघि गए अचरज नाही॥१९॥

दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥२०॥

राम दुआरे तुम रखवारे
होत ना आज्ञा बिनु पैसारे॥२१॥

सब सुख लहैं तुम्हारी सरना
तुम रक्षक काहु को डरना॥२२॥

आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाँक तै कापै॥२३॥

भूत पिशाच निकट नहि आवै
महावीर जब नाम सुनावै॥२४॥

नासै रोग हरे सब पीरा
जपत निरंतर हनुमत बीरा॥२५॥

संकट तै हनुमान छुडावै
मन क्रम वचन ध्यान जो लावै॥२६॥

सब पर राम तपस्वी राजा
तिनके काज सकल तुम साजा॥२७॥

और मनोरथ जो कोई लावै
सोई अमित जीवन फल पावै॥२८॥

चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा॥२९॥

साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे॥३०॥

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता॥३१॥

राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा॥३२॥

तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥

अंतकाल रघुवरपुर जाई
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥३४॥

और देवता चित्त ना धरई
हनुमत सेई सर्व सुख करई॥३५॥

संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥३६॥

जै जै जै हनुमान गुसाईँ
कृपा करहु गुरु देव की नाई॥३७॥

जो सत बार पाठ कर कोई
छूटहि बंदि महा सुख होई॥३८॥

जो यह पढ़े हनुमान चालीसा
होय सिद्ध साखी गौरीसा॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मह डेरा॥४०॥

दोहा

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥

तर आता आपण हनुमान चालीसा चा अर्थ प्रत्येक श्लोक अनुसार काय होतो ते बघू:-

॥ दोहा ॥


श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि । बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥




श्री गुरूंच्या चरण कमळांच्या धुळीने मी माझे मन दर्पण पवित्र करून धर्मार्थ काम मोक्ष व इतर फळे देणारे श्री रघुवीर श्रीराम यांच्या निर्मळ यशाचे वर्णन करत आहे.

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार । बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥





हे पवनपुत्र हनुमान मी बुद्धीहीन आपलं स्मरण करत आहे मला तुम्ही बळ सदबुद्धी आणि ज्ञान द्या तसेच माझ्या दुःखांचा व माझ्यामध्ये असलेला दोषांचा नाश करा

जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥





हे हनुमान आपला जय जयकार असो तुम्ही ज्ञान गुण सागर आहात हे कपीस्वरा तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती प्रकट आहे

राम दूत अतुलित बल धामा । अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥




हे पवनपुत्र अंजनी नंदन श्रीरामाचे दूध या संपूर्ण संसारामध्ये तुमच्यासारखं बलवान असं कोणीही नाही

महाबीर बिक्रम बजरंगी । कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥




हे बजरंग बली तुम्ही महावीर आणि पराक्रमी आहात तुम्ही दूर बुद्धीला दूर करतात आणि ज्यांची चांगली बुद्धी आहे त्यांना नेहमी सहाय्य करतात

कंचन बरन बिराज सुबेसा । कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥




तुमचा रंग कंचन सारखा आहे तुम्ही सुंदर कपडे तसेच कानामध्ये कुंडल व कुरळे केसांनी सुशोभित झालेल्या आहात. 


हाथ बज्र और ध्वजा बिराजै । काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥




आपल्या हातामध्ये वज्र आणि ध्वज आहे तसेच आपल्या खांद्यावर मुंजीचे जाणवे आपली शोभा खूप वाढवत आहे.


संकर सुवन केसरी नंदन । तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥




हे शंकराचा अवतार हे केसरी नंदना तुमच्या पराक्रमाची व महान यशाची संपूर्ण जगात वंदना होते.

बिद्यावान गुनी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ॥०७॥




तुम्ही अत्यंत चतुर विद्यावान आणि गुणवान आहात भगवान श्रीरामाचे कार्य करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असतात

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया । राम लखन सीता मन बसिया ॥०८॥




तुम्हाला श्रीरामाची कथा ऐकण्यात विलक्षण आनंद येतो प्रभू श्रीराम आपल्या हृदयात माता सीता व लक्ष्मण सकट वसलेले आहेत

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा । बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥





तुम्ही अति सूक्ष्म रूप धारण करून माता सीतेला दाखवलं होतं तसंच आती भयंकर रूप धारण करून रावणाची लंका जाऊन टाकली होती

भीम रूप धरि असुर सँहारे । रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥




तुम्ही भयंकर रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता आणि भगवान श्रीरामाच्या उद्देशाला यश मिळण्यासाठी सहयोग दिलं होतं

लाय संजीवन लखन जियाये । श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥




तुम्ही संजीवनी बुटी आणून श्री लक्ष्मणास जीवनदान दिलं होतं तेव्हाच प्रभू श्रीरामांनी तुम्हाला आनंदाने गळ्याला लावलं होतं

रघुपति किन्ही बहुत बड़ाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥




हे अंजनी नंदना भगवान श्रीरामांनी त्यावेळेस तुमची खूप प्रसन्नता केली होती व म्हणले होते की तुम्ही पण मला भरता सारखेच प्रिय आहात

सहस बदन तुम्हरो जस गावैं । अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥




हजारो मुखांमधून तुमच्या यशाचे गीत म्हणले जाते असे म्हणून श्रीरामचंद्रांनी तुम्हाला आलिंगन दिलं होतं

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा । नारद सारद सहित अहीसा ॥१४॥




सनातन सनक सनंदन तसेच मुनी ब्रह्मा आणि इतर देवता तसेच शेषनाग सगळेजण आपले गुणगान करतात

जम कुबेर दिगपाल जहाँ ते । कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥




यम कुबेर दि कपाल कवी आणि विद्वान या जगात कोणीही आपल्या यशाचे पूर्णपणे वर्णन नाही करू शकत


तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा । राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥





तुम्ही सुग्रीवाची भेट श्री रामचंद्रांशी करून देऊन त्यांच्यावर उपकार केले व त्यांना राजा बनवले

तुम्हरो मंत्र बिभीषन माना । लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥





तुम्ही केलेले मार्गदर्शन विभीषण यांनी स्वीकारले ज्याचे फळ म्हणून ते लंकेचे राजा बनले ह्याला संपूर्ण जग मान्यता देते

जुग सहस्त्र जोजन पर भानु । लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥




हजारो योजना दूर असलेला व तसेच जिथे पोहोचायला हजारो युग लागतील अशा सूर्याला तुम्ही गोड फळ समजून गिळायचा प्रयत्न केला होता

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं । जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥




भगवान रामाने दिलेली अंगठी तोंडामध्ये ठेवून तुम्ही समुद्र पार केला होता पण हे असे करणे तुम्हाला काही मोठी गोष्ट नव्हती

दुर्गम काज जगत के जेते । सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥




या संसारात कितीही कठीण कठीण काम असेल तरी तुमच्या कृपेने ते अगदी सहजपणे पूर्ण होते

राम दुआरे तुम रखवारे । होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥




तुम्ही श्रीरामचंद्रांच्या महालाचे द्वारपाल आणि रक्षक आहात तुमच्या आज्ञेशिवाय त्या ठिकाणी कुणीही प्रवेश करू नाही शकत
सब सुख लहै तुम्हारी सरना । तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥




तुम्हाला शरण आलेल्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण सुखाची प्राप्ती होते आणि त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही

आपन तेज सम्हारो आपै । तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥




तुमच्या वेगाला केवळ तुम्ही सहन करू शकता तुमच्या सिंहगर्जनेने तिन्ही लोकांचे प्राण थरथर कापतात


भूत पिसाच निकट नहिं आवै । महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥




जो कोणी आपल्या महावीर नावाचा जप करतो त्याच्याजवळही कधी भूत पिशाच दृष्ट आत्मा चुकूनही फिरत नाही

नासै रोग हरै सब पीरा । जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥




हे वीर हनुमान तुमच्या नावाचा सतत जप केल्याने सर्व प्रकारचे रोग व कष्ट दूर होऊन जातात

संकट तें हनुमान छुडावे । मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥




जो कोणी मन क्रम वचने तुमचं ध्यान करतो हे हनुमाना तुम्ही त्याची दुःखांपासून व संकटांपासून सदासाठी सुटका करता
सब पर राम तपस्वी राजा । तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥




राजा श्री रामचंद्र हे जगातील सर्वश्रेष्ठ आणि तपस्वी राजा आहेत आणि त्यांच्या सगळ्या कामांना तुम्ही पूर्णत्वास नेले आहे
और मनोरथ जो कोई लावै । सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥




जो कोणी भक्त आपलं ध्यान करतो तुमच्या कृपेमुळे त्याचे मनोरथ लगेच पूर्ण होते

चारो जुग परताप तुम्हारा । है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥




ही रामभक्त तुमचे यश चारी युगांमध्ये विद्यमान आहे संपूर्ण जगामध्ये तुमची कीर्ती प्रकाशमान आहे
साधु सन्त के तुम रखवारे । असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥




जय श्री रामाच्या प्रिय भक्त हनुमाना तुम्ही साधुसंत सज्जन आणि धर्म यांची रक्षा करता तसेच असूरांचा सर्वनाश घडून आणता

अष्टसिद्धि नौ निधि के दाता । अस बर दीन जानकी माता ॥३१॥




माता जानकीने दिलेल्या आशीर्वादामुळे तुम्ही कुठल्याही भक्ताला आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता
राम रसायन तुम्हरे पासा । सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥




तुम्ही सदैव रघुनाथ जी च्या चरणांमध्ये राहतात त्यामुळेच आपल्याकडे असाध्य रोगांची औषध श्रीराम नाम आहे
तुम्हरे भजन राम को पावै । जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥




तुमचे भजन करणाऱ्या व्यक्तीला श्रीरामाचे दर्शन होते व जन्मोजन्मीचे दुःख दूर होऊन जाते
अन्त काल रघुबर पुर जाई । जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥




तुमचे नाम जपणारे प्राणी शेवटच्या वेळी श्रीराम धामाला जातात आणि मृत्यूलोकातही जन्म घेऊन हरिभक्त म्हणून प्रसिद्ध होतात
और देवता चित्त न धरई । हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥




जो खऱ्या मनाने आपली सेवा करतो त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते मग त्याने पुण्यात दुसऱ्या देवतांची पूजा का करावी

संकट कटै मिटै सब पीरा । जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥




हे महाबळी हनुमान जो फक्त तुमचं स्मरण करतो त्याचे सर्व संकट आणि पीडा मिटून जाते
जय जय जय हनुमान गोसाईं । कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥




हे वीर हनुमान तुमचा सदा जय जयकार असो तुम्ही माझ्यावर श्री गुरु सारखी कृपा करा

जो सत बार पाठ कर कोई । छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥




जो कोणीही ह्या हनुमान चालीसा शंभर वेळेस पाठ करेल त्याचे सगळे बंधन नष्ट होतील आणि त्याला परम सुखाची प्राप्ती होईल
जो यह पढ़ै हनुमान चालीसा । होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥




गौरीपती भगवान शिव साक्षी आहेत जो कोणी ही हनुमान चालीसा वाचेल त्याला अवश्यही सर्वसिद्धींची प्राप्ती होईल
तुलसीदास सदा हरि चेरा । कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥




हे माझे नाथ हनुमान जी! 'तुळसीदास' सदासाठी 'श्रीराम' दास आहे तरी तुम्ही त्यांच्या हृदयामध्ये सदा सर्वदा निवास करा.
॥ दोहा ॥

पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति रूप । राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ॥




हे पवनपुत्र तुम्ही संकट हरण आणि मंगलरूप आहात तुम्ही श्रीराम जानकी आणि लक्ष्मण सहित सदासाठी माझ्या हृदयात निवास करा.

तर मित्रांनो,

 वर हनुमान चालीसा संपूर्णपणे मराठीतून अर्थासहित दिलेली आहे.
 आपण नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे व आपल्या दुःखांचे पूर्ण निराकरण करावे.

श्री मारुतीवर अजून स्तोत्रे, आरती, व माहितीसाठी ह्या वेबसाईटचे सगळे पोस्ट जरूर बघावे, तसेच आपल्या प्रियजनांना ही वेबसाईट शेअर करावी व त्यांना वरील माहितीचा लाभ मिळवून द्यावा.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url